
बेलगाम प्राईड/ पत्नीचे इतर व्यक्तींशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झालेल्या वादातून संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यावर चक्क उकळते तेल ओतल्याची धक्कादायक घटना रामनगर (मच्छे) येथे सोमवारी दुपारी घडली. या घटनेत पती सुभाष पाटील (वय 55) हे गंभीर भाजल्याने प्रथमोपचार जिल्हा रुग्णालयात करून अधिक उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पत्नी वैशाली पाटील ही पतीबरोबर वाद घालून घर सोडून गेली होती. तिला मुलीचे विवाह ठरल्याचे कळताच तिने पतीच्या घरी प्रवेश केला. पती सुभाष याने घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते हे पत्नीने बंद करून ठेवण्यात आले होते सुभाष यांना मोबाईलवर बंद असल्याचे आढळून आल्याने त्यांनी पत्नीला विचारले असता तिने वाद निर्माण करून तेल उकळून पतीच्या डोक्यात घालून ठार मारण्याचा कट रचला होता.

त्यामध्ये सुभाष हे गंभीर जखमी झाले आरडाओरडा करत घराबाहेर येऊन समोर असलेल्या पाण्याच्या टाकीत डोके घालून आसरा घेण्याचा प्रयत्न केला. हा आरडा ओरोड पाहून मुलीने घराबाहेर आले घडलेल्या प्रकार बघून तिने आरडाओरड केली सुभाषने आपल्या माहितीत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मुलीला सांगून त्या व्यक्तीला बोलवून घेऊन दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मात्र यांना अधिक उपचारासाठी प्रभाकर कोरे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी सुभाषच्या हातात असलेला मोबाईल पत्नीने दगड घालून फोडून टाकण्यात आला परत कुणाशी संपर्क साधून नये असा तिचा विचार होता. सुभाष पाटील हे माजी ग्रामपंचायत सदस्य असून, खानापूर तालुक्यातील बिदरभावी हे मूळ गाव आहे. दोघांनीही प्रेमविवाह केला असून, गेल्या काही वर्षांपासून मच्छे (रामनगर) येथे स्थायिक झाले होते. येथे त्यांचा घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे.
या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना कळतच पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन याची माहिती घेऊन या घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामध्ये पत्नी वैशाली पाटील हिला ग्रामीण पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.




