
बेलगाम प्राईड/ आज एक नोव्हेंबर रोजी बेळगावत राज्य उत्सव मिरवणूक काढण्यात आली होती या राज्याचे मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर नृत्य तसेच काही युवकांच्या ग्रुपमधून अदावाद होऊन चाकू हल्ला झाल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी येथे घडली.
त्यांपैकी तिघांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्योत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मिरवणुकीदरम्यान काही दंगलखोर युवकांनी चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले आहेत .
या हल्ल्यात गुरुनाथ वक्कुंड, सचिन कांबळे, लोकेश बेटगेरी, महेश, विनायक आणि नजीर पठाण अशी जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. या घटनेचा गुन्हा एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.




