Uncategorized
Trending

राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात दोन दिवस मद्य विक्री बंदी

बेलगाम प्राईड/ बेळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटक अबकारी अधिनियम 1965 च्या कलम 21(1) आणि कर्नाटक पोलिस अधिनियम 1963 च्या कलम 31 अंतर्गत शहराचे पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोऱसे यांनी १ नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यविक्री बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार, दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बेळगाव शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या मद्यविक्री व दारू बाळगणे पूर्णपणे बंद असणार आहे.

या काळात सर्व दारू दुकाने, वाईन शॉप, बार, क्लब, हॉटेलमधील बार तसेच KSBC एल डेपो बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व अबकारी परवाना असलेली दुकाने सील करण्यात येतील.

बेळगाव शहरातील शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यकतेनुसार अबकारी निरीक्षक, उपविभागीय अबकारी अधीक्षक आणि पोलिस अधिकारी यांनी कर्नाटक अबकारी अधिनियम 1965 च्या कलम 21(2) व कर्नाटक पोलिस अधिनियम 1963 च्या कलम 31 नुसार आवश्यक ती पावले उचलावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!