
बेलगाम प्राईड /स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे युवा जलतरणपटू वेदांत मिसाळे आणि निधी कुलकर्णी यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने अलिकडेच संपलेल्या सीबीएसई राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2025 मध्ये बेळगाव शहराचे नांव उंचावताना एकूण 4 पदके जिंकली.
हरियाणा येथे गेल्या 17 ते 21 सप्टेंबरपर्यंत मुलांची आणि भुवनेश्वर येथे 24 ते 27 सप्टेंबरपर्यंत मुलींची सीबीएसई राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2025 यशस्वीरित्या पार पडली सदर स्पर्धेत बेळगावच्या वेदांत मिसाळे याने 2 सुवर्ण पदके आणि 1 रौप्य पदक, तर निधी कुलकर्णी हिने 1 कांस्य पदक पटकावले. वेदांत मिसाळे हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी असून निधी कुलकर्णी ही केएलएस पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे. हे दोघेही प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव येथील केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी ऑलिंपिक आकाराच्या स्विमिंग पूलमध्ये कठोर प्रशिक्षण घेतात. या सर्वांना डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, आणि अनेक हितचिंतकांचा पाठिंबा व प्रोत्साहन लाभत आहे.




