बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्य पॅरा स्विमिंग स्पर्धेत बेळगावचा स्पर्धकांचे नावलौकिक

बेलगाम प्राईड/ बेंगळुरू येथे झालेल्या कर्नाटक राज्य पॅरा स्विमिंग स्पर्धेत स्विमर्स क्लब, व एक्वेरियस स्वीमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ९३ पदके पटकावली आहेत. यामध्ये ६२ सुवर्ण, २३ रौप्य आणि ८ कांस्य पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत विविध गटातील सुमारे ३० पेक्षा अधिक स्वीमर्सनी सहभाग घेतला. यापैकी २० हून अधिक खेळाडूंची निवड येत्या १५ ते १८ नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या २५ व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हे सर्व खेळाडू केएलई सुवर्ण जेएनएमसी ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल, बेळगाव येथे उमेश कलघाटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक अक्षय शेरगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणाचा सराव करतात.
खेळाडूंना डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), श्री जयंता हुम्बरवाडी, द अलाईड फाउंडर्स, एसएलके ग्रुप बेंगळुरू, रोटेरियन अविनाश पोटदार, सौ. मानी कापडिया, सौ. लता कित्तुर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर यांचे सहकार्य लाभले आहे.




