Uncategorized
Trending

काव्यशेकोटी संमेलन – 2025 : नवोदित कवींना सुवर्ण संधी!

बेलगाम प्राईड/शब्द, निसर्ग आणि भावना यांच्या संगमात नटलेली काव्यप्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी नवोदित कवींसाठी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – कोल्हापूर यांच्या सौजन्याने, तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “काव्यशेकोटी संमेलन – 2025” हा भव्य आणि बहारदार काव्योत्सव रविवार, दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. खांडेकर कॉम्प्लेक्स, बेळगाव–वेंगुर्ला रोड, शिनोळी येथे आयोजित करण्यात आला आहे.

महिपाळगडाच्या पायथ्याशी, वैद्यनाथ मंदिराच्या प्राचीन हेमाडपंती शिल्पकलेची साक्ष ठेवत, निसर्गरम्य वातावरणात होणारे हे संमेलन नवोदित कवींकरिता प्रेरणादायी मंच ठरेल, असा आयोजकांना विश्वास आहे.

नवोदित कवींना “काव्योंजळ” अर्पण करण्याचे खुले आवाहन

या संमेलनात कोणत्याही प्रकारची एक कविता—काव्यवाचन किंवा काव्यगायन—सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. साहित्यविश्वात आपली ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या नवोदित कवींसाठी हे व्यासपीठ म्हणजे उत्साह, आत्मविश्वास आणि प्रगतीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

सहभागाची नाममात्र फी रु. 500/- असून सहभागी कवींना

✔️ काव्य सादरीकरण

✔️ आकर्षक सन्मानचिन्ह

✔️ सन्मानपत्र

✔️ काव्यसंग्रह पुस्तक

✔️ स्नेहभोजन

ही विशेष सुविधा मिळणार आहे.

नोंदणीची अंतिम तारीख : 25 नोव्हेंबर 2025

सहभागासाठी PhonePe / Google Pay द्वारे नोंदणी करता येईल.

संपर्क : 📞 संजय साबळे – जिल्हाध्यक्ष, अभासा परिषद कोल्हापूर (9420973151)

📞 सौ. मनिषा उदय डांगे – महिला जिल्हाध्यक्षा

संमेलनाचे प्रेरणास्थान सीमाकवी रवींद्र पाटील (कुद्रेमानी) यांनी नवोदित कवींना आवाहन करताना म्हटले की, “कविता ही मनाच्या गाभाऱ्यातील स्पंदने आहेत. त्या जगापर्यंत पोहोचाव्यात, म्हणून हे व्यासपीठ.”

काव्याची ही शेकोटी उजळविण्यासाठी नवोदित कवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

— अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोल्हापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!