
बेलगाम प्राईड/ आंतरराज्य सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्या जवळून 10:5 लाखाचे दागिने जप्त करून त्या दोघांना अटक करण्यात आल्याची कारवाई टिळकवाडी पोलीसानी केली आहे.
पोलिसांनी या दोन आरोपींकडून बेळगाव आणि गोवा राज्यातील एकूण पाच गुन्ह्यांमधील १० लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे.

बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोदय कॉलनी येथे दोन ठिकाणी चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने, खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजारी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी या स्थानकातील सहकारी पोलीस पथकाने तपास केला आहे.
या पथकाने आरोपी अमन दीपक राऊत (वय २२) रा. चितळे स्टेशन ता. राहता, अहमदनगर, महाराष्ट्र, सध्या: गंगाधर नगर, ७ वी क्रॉस, के.डी.ओ. स्कूलजवळ, हुब्बळ्ळी) तर नागराज बसप्पा हरणिशिकारी (वय १९) रा. कवलूर मसुती गल्ली, ता. जि. कोपळ, सध्या: गंगाधर नगर, ७ वी क्रॉस, के.डी.ओ. स्कूलजवळ, हुब्बळ्ळी) या दोघांना अटक केले आहे.
या दोन्ही आरोपींकडून बेळगाव शहरातील टिळकवाडी, एपीएमसी आणि खडेबाजार पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक साखळी चोरीचा गुन्हा, तसेच गोवा राज्यातील मडगाव पोलीस ठाण्यातील दोन साखळी चोरीचे गुन्हे, असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. या दोन आरोपींकडून एकूण १०,२५,०००/- रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या तपास पथकात टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, पीएसआय विश्वनाथ घंटामठ, प्रभाकर डोली तपास कार्यातील सहकारी पोलीस महेश पाटील, एस. एम. करलिंगण्णावर, लाडजीसाब मुलतानी, नागेंद्र तळवार, सतीश गिरी यांचा समावेश होता. बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी या पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.




