
बेलगाम प्राईड /कर्नाटक सरकारने अधिकृतरित्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे नाव “शिवबसव महास्वामीजी रेल्वे स्टेशन बेळगाव”असे करण्यास मंजुरी दिली आहे. राज्य शासनाचा आदेश ५ नोव्हेंबर २०२५* रोजी जारी झाला असून ही प्रस्तावना आता केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडे अंतिम मंजुरी व अधिसूचनेसाठी पाठविण्यात आली आहे.
बेळगावला नवी सांस्कृतिक ओळख
बेळगाव रेल्वे स्थानक ( BGM) लवकरच नव्या नावाने ओळखले जाणार आहे. हा निर्णय दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) झोनअंतर्गत हुबळी विभागातील प्रमुख स्थानकांच्या नावबदलाच्या उपक्रमाचा भाग आहे. राज्याच्या पायाभूत सुविधा, बंदरे आणि अंतर्गत जलवाहतूक विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार या नावबदलास अधिकृत संमती देण्यात आली आहे.
इतर प्रस्तावित स्थानक नामांतरे राज्यातील आणखी तीन रेल्वे स्थानकांच्या नावबदलाच्या प्रस्तावांनाही मंजुरी देऊन केंद्राकडे पाठविण्यात आले आहे.
🔹 बीदर → “चन्नबसव पत्तदेवरू रेल्वे स्टेशन”
🔹 विजयपूर → “ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी रेल्वे स्टेशन”
पुढील पाऊल : केंद्र सरकारची अधिसूचना राज्य सरकारने या प्रस्तावांना *गृहमंत्रालयाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवून विनंती केली आहे. केंद्र सरकारकडून अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, भारतीय रेल्वेच्या फलकांवर, उद्घोषणांमध्ये, नकाशांमध्ये आणि ऑनलाइन प्रणालींमध्ये नवीन नावांचा वापर सुरू होणार आहे.




