
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयात ‘राष्ट्रीय ऐक्य सप्ताह’ निमित्त शपथ ग्रहण
बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात राष्ट्रीय ऐक्य सप्ताह निमित्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गांनी राष्ट्रीय ऐक्याची शपथ ग्रहण केली.
देशात वाढत असलेल्या हिंसाचार व साम्प्रदायिक द्वेषाला आळा घालून राष्ट्राची स्वातंत्र्य, एकता व अखंडता अधिक बळकट करण्याचा संकल्प या शपथेमधून व्यक्त करण्यात आला.




