Uncategorized
Trending

एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली भेट

बेलगाम प्राईड / महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एआयसीसी अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांची बेंगलोर येथे भेट घेतली 28 नोव्हेंबर रोजी पॅलेस ग्राउंड येथे होणाऱ्या अंगणवाडी केंद्र सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. 

बेंगलोर सदाशिवनगर येथील मलिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी रविवारी 23 रोजी मंत्री हेब्बाळकर यांनी खर्गे यांची भेट घेतली तसेच या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पत्र दिले.

यानंतर पत्रकारांची बोलताना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले बेंगळूर पॅलेस ग्राउंड वरील कृष्णा विहार येथे अंगणवाडी केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास्थळी जाऊन मंत्री हेब्बाळकर यांनी तयारीचा आढावा घेतला कार्यक्रमात 50 हजारहून अधिक महिला सहभागी होणार असून कार्यक्रमात कोणत्याही त्रुटी राहणार नाही. याची काळजी घ्यावी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिला आणि मुलांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्याने दिले.

याप्रसंगी महिला आणि बालविकास विभागाच्या मुख्य सचिव डॉ. श्यामला इकबाल विभागाचे संचालक महेश बाबू आणि मंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी निश्चल उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!