
बेलगाम प्राईड/बेळगाव शहर क्राईम विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांची बदली करण्यात आली असल्याने त्यांचा पोलीस आयुक्तालय तर्फे रविवारी निरोप समारंभ सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली आहे. बेळगाव शहर पोलीस विभागातर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे पोलीस उपायुक्त एन व्ही बर्मनी पोलीस उपयुक्त निरंजन राजर्स मार्केटचे एसीपी सत्यनायक यांच्यासह एसीपी सहाय्यक पोलीस उपस्थित होते.




