
बेलगाम प्राईड/ माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांची शहर सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकतीच सूत्रे स्विकारली आहेत बी. आर. गड्ढेकर यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त झाले होते.
गेल्या आठवड्यात शंभरहून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये माळमारुती ठाण्याचे पोलीस निरीक्षक कालीमिर्ची यांचीही बदली झाली. या आदेशात त्यांच्या नियुक्ती देण्यात आली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे शहर सीईएन पोलीस ठाण्याचा भार सोपवण्यात आला. सोमवारी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.
१ नोव्हेंबर काळ्या दिना वेळी कालीमिर्ची यांची म. ए. समितीतर्फे निघणाऱ्या काळा दिन फेरीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असते अशांबरोबर तुम्ही सातत्याने राहायला हवे, असा वरिष्ठ पोलिसांचा आदेश असतो. 1 नोव्हेंबर दिवशी कन्नड-मराठी वादामुळे समितीचे युवानेते शुभम शेळके हे पोलिसांच्या रडारवर होते. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी कालीमिर्ची यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे काळादिन फेरीच्या आधी
माळमारुती ठाण्यातून बदली झाल्यानंतर काही दिवस ते रजेवर होते. त्यातच चुकीच्या वृत्तांमुळे मनस्ताप सहन करावा लागला. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार सध्या आपण शहर सीईएन विभागात निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
–जे. एम. कालीमिर्ची, पोलीस निरीक्षक, सीईएन विभागात बदली
कालीमिर्ची यांनी शेळके यांच्यासोबत सेल्फी घेऊन ते त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवली. हा त्यांच्या नियमित ड्युटीचा भाग होता. परंतु, काही माध्यमांनी सेल्फी घेतानाचे छायाचित्र प्रसारित करून काही कन्नड माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने ही बातमी व्हायरल केली.
निरीक्षकांच्या बदलीची यादी आली तेव्हा कालीमिर्ची यांचेही यामध्ये बदली झाल्याचा आदेश होता. माळमारुती ठाण्यात दोन वर्षांहून अधिक काळ झाल्याने ती नियमित बदली होती. परंतु, सोशल मीडियावर त्यांना निलंबित केल्याचेही खोटे वृत्त व्हायरल झाले होते. तथापि, त्यांची फक्त बदली झाली होती.




