
बेलगाम प्राईड/ बेळगावचे सुप्रसिद्ध वैदिक ज्योतिषी गणेशशास्त्री शुक्ल गुरुजी यांना गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशनामध्ये प्रतिष्ठेची ‘ज्योतिषाचार्य’ या पदवी प्रदान करून नुकतेच गौरवण्यात आले.
पणजी, गोवा येथील काकूला मॉल येथे गेल्या शुक्रवार व शनिवारी आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. जयसिंगराव चव्हाण ज्योतिष संस्था, कराड (महाराष्ट्र) यांनी आयोजित केलेल्या या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. सदर अधिवेशनात गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मान्यवर ज्योतिष अभ्यासक व ज्योतिष शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला. ज्योतिष संस्थेचे संचालक व अधिवेशनाचे आयोजक दत्तप्रसाद जयसिंगराव चव्हाण यांच्या हस्ते बेळगावचे प्रसिद्ध वैदिक गोष्टीशी गणेशशास्त्री शुक्ल गुरुजी यांना ‘ज्योतिषाचार्य’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. वाळपई गोवा येथील ज्योतिषी संजय केळकर व फोंडा येथील सात्विक अभिषेकी यांचाही अधिवेशनात सत्कार करण्यात आला.




