Uncategorized
Trending

महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवरील खटल्यांची सुनावणी लांबणीवर

बेलगाम प्राईड,/ महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर विविध प्रसंगी दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांची सुनावणी मंगळवारी जिल्हा न्यायालयात होती. मात्र, काही प्रकरणांतील फिर्यादी तसेच महत्त्वाचे साक्षीदार अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने २०१७, २०१८ आणि २०२१ मधील महामेळाव्यांदरम्यान परवानगी न घेता सभा आयोजित केल्याच्या आरोपावरून समितीचे प्रमुख नेते दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आणि अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले गेले होते.

तसेच ‘सकल मराठा मोर्चा’च्या वेळी ‘महाराष्ट्र’ असा उल्लेख असलेल्या टी-शर्टची विक्री केल्याप्रकरणी शहाजीराजे भोसले आणि मोर्चाचे आयोजक प्रकाश मरगाळे यांच्यावरही स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण खडेबाजार, कॅम्प आणि टिळकवाडी पोलिस ठाण्यात नोंद आहे.

न्यायालयात सुनावणी होत असताना महत्त्वाचे दस्तऐवज व साक्षीदार उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याने सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली. संबंधित सर्व आरोपींचे प्रतिनिधित्व अँड. महेश बिर्जे, अँड. बाळासाहेब कागणकर, अँड. वैभव कुट्रे, अँड. अश्वजीत चौधरी आणि अँड. रिचमॅन रिकी हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!