
बेलगाम प्राईड/ जर्मनी येथे होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्स 2025 स्पर्धेसाठी निवड झालेल्या शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री यांचा बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन आणि स्पोर्ट्स तसेच कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन स्पोर्ट्स यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात थायलंड, पटाया येथे होणाऱ्या मिस्टर आशिया 2025 स्पर्धेसाठी निवड झालेल्या चेतन ताशिलदार आणि रोनाक गवस या खेळाडूंच्याही कामगिरीचा गौरव करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक तसेच अनेक व्यायामपटू उपस्थित होते. संघटनेतर्फे तिघा बॉडी बिल्डर्सना आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




