
बेलगाम प्राईड दि.२६ / येथील मराठा मंडळ संस्थेच्या फार्मासी कॉलेज मधे B.Pharmacy या अभ्यासक्रमात चौथ्या सेमिस्टर मधे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर झाला असून.. विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
१) कु. श्रुती मुचंडी हिने ८४.२८% गुण मिळवून प्रथम क्रमांक
२) कु. शिवानी बुलके हिने ७९.८५% द्वितीय क्रमांक तर
३) कु. रोशनी नायकोजी हिने ७९.५७% गुण मिळवत तृतीय क्रमांक
प्राप्त केलेला आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश मिळवलं आहे.
कॉलेजचे प्राचार्य डॉ.विष्णु कंग्राळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून हे यश मिळवले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य ही देखील या यशामागची महत्त्वाचे कारणं आहेत,” असं प्राचार्यांनी सांगितलं. या यशामुळे मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. रजश्री नागराजु यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




