
बेलगाम प्राईड/ बेळगाव मध्ये राहून ऑनलाइन द्वारे अमेरिकन नागरिकांना फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगस कॉल सेंटर उघडकीस आणल्यानंतर, बेळगाव सीसीबी पोलिसांनी 33 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

या प्रकरणातील आरोपींना शुक्रवारी तिसऱ्या जेएमएफसी न्यायालयात न्यायाधीश पल्लवी पाटील यांच्या समक्ष हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.




