
पाकिस्तानआंतरराष्ट्रीय एअरलाईन्सला आर्थिक संकटातून जात असलेल्या एअरलाईन्सला (PIA) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पगार थकल्यामुळे एअरक्राफ्ट इंजिनिअर्सनी ‘एअरवर्दीनेस क्लियरन्स’ देणं पूर्णपणे थांबवल्याने एअरलाईन्सचं संपूर्ण कामकाज ठप्प झालं आहे. सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून एकही आंतरराष्ट्रीयविमानाचं उड्डाण झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान १२ नियोजित उड्डाणांवर याचा परिणाम झाला आहे. शेकडो प्रवासी इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथील प्रमुख विमानतळांवर अडकले आहेत.




