
बेलगाम प्राईड/ स्विमर्स क्लब आणि अॅक्वेरियस स्विम क्लबचे बेळगाव मधील ज्येष्ठ जलतरणपटूंनी सहनशक्ती आणि कौशल्याचे उल्लेखनीय प्रदर्शन करत कर्नाटक जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या 26 व्या राज्यस्तरीय मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिप 2025 या जलतरण स्पर्धेमध्ये 7 सुवर्ण पदकांसह एकूण 17 पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केले आहे.
बेंगलोर येथील विजयनगर अॅक्वाटिक सेंटर येथे गेल्या 1 व 2 नोव्हेंबर 2025 रोजी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. बेळगावच्या जलतरणपटूंनी या स्पर्धेत वर्चस्व गाजवत एकूण 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदके पटकावली आहेत बेळगावच्या ज्येष्ठ जलतरणपटूंनी मिळविलेले यश पुढीलप्रमाणे आहे. अजय आचार्य –100 मी. बॅकस्ट्रोक (सुवर्ण), 100 मी. बटरफ्लाय (सुवर्ण), 200 मी. वैयक्तिक मेडले (सुवर्ण), 200 मी. फ्रीस्टाइल (कांस्य), 4×50 मी. मेडले रिले (कांस्य). तर रिदम त्यागी यांनी –100 मी. बटरफ्लाय (सुवर्ण), 4×50 मी. फ्रीस्टाइल रिले (सुवर्ण), 50 मी. बॅकस्ट्रोक (रौप्य), 4×50 मीटर मेडले रिले (सुवर्ण), 100 मी. बॅकस्ट्रोक (कांस्य), 200 मी. वैयक्तिक मेडले (कांस्य). लक्ष्मण कुंभार यांनी–50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक (सुवर्ण), 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक (सुवर्ण), 4×50 मी. मेडले रिले (कांस्य). सुषमा प्रभू यांनी –100 मी. बटरफ्लाय (सुवर्ण). एन. लोकप्पा –100 मी. फ्रीस्टाइल (कांस्य), 4×50 मी. मेडले रिले (कांस्य). राही कुलकर्णी यांनी (चौथ्या स्थानासह प्रशंसनीय सहभाग) यापैकी सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूंची राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी अभिमानास्पद निवड झाली आहे.
यशस्वी जलतरणपटू बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी (ऑलिंपिक आकारच्या) स्विमिंग पूल येथे जलतरणाचा सराव करतात. त्याना जलतरणचे गुरु उमेश कलघटगी, प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन,तर डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानी कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाने, आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.




