
बेलगाम प्राईड/ दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मंडोळी हायस्कूल, मंडोळी येथील विद्यार्थी पार्थ उत्तम कणबरकर याने राज्यस्तरीय मिनी ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रभावी कामगिरी बजावत थाळीफेक प्रकारात द्वितीय क्रमांक घेऊन रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे.
यापूर्वी बेळगाव जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात पार्थने थाळीफेक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला होता. या यशाच्या जोरावर त्याची कर्नाटक राज्य मिनी ॲथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली होती.
नुकतीच बेंगलुरू येथे पार झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पार्थने दमदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले. या विजयानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक एस. एन. बेळगुंदकर मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी पार्थचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




