
बेलगाम प्राईड/ म्हैसूर येथे ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब व अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी अभूतपूर्व यश मिळवत ९ सुवर्ण, १४ रौप्य व १९ कांस्य असे ४२ पदके जिंकली. या चमकदार कामगिरीच्या बळावर १३ जलतरणपटूंची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशासाठी स्विम गुरु उमेश कलघटगी तसेच प्रशिक्षक अक्षय शेरगार, अजिंक्य मेंडक, नितीश कुदुचकर, गोवर्धन काकतकर व इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. जलतरणपटूंनी सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे जयंंत हुंबरवाडी व अन्य मान्यवरांचे आभार मानले आहेत.




