Uncategorized
Trending

शेतकऱ्याची कन्या समिधाचे कुस्ती स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

बेलगाम प्राईड /शेतकरी घराण्यात जन्मलेली बैलजोडीच्या कष्टातून प्रेरणा घेत वाढलेली आणि जिद्द बाळगणारी वडगाव रयत गल्लीची समिधा भोमेश बिर्जे ही एक बेळगावच्या क्रीडा विश्वात नवीन ओळख निर्माण केली आहे.

दोन प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सलग दोन सुवर्ण पदकांची कमाई करून समिधाने केवळ आपल्या कुटुंबाचा नव्हे, तर बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींचा आत्मविश्वास उंचावला आहे.सकाळी घरातील शेती कामात मदत आणि संध्याकाळी कुस्तीची सरावमैदानी लढाई — असा दिनक्रम तिने स्वतःसाठी ठरवला. मातीच्या आखाड्यातून प्रशिक्षण सुरू करून, त्या आखाड्यातूनच राज्यस्तरीय मंचावर झेपावणे हे कोणत्याही खेळाड्यासाठी सोपे नाही. पण समिधाने ते शक्य केले.

बंगळुरू मिनी ऑलंपिक, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा — ३९ किलो गट : सुवर्ण पदक

मिशन ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धा, बेळगाव — ३९ किलो गट : सुवर्ण पदक :हे सुवर्ण पदक म्हणजे फक्त धातू नाही; ते शेतकऱ्याच्या घरात उगवलेल्या मुलीच्या कष्टाचे आणि आत्मविश्वासाचा सुवर्ण पुरावा आहे. समिधाच्या विजयाने संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.

हलगा-मच्छे बायपास आंदोलनात धैर्याने लढणाऱ्या शेतकरी कुटुंबाची मुलगी आज क्रीडा क्षेत्रातही पुढे सरसावली आहे म्हणजे “शेतकरी फक्त अन्नच नव्हे तर सुवर्ण क्रीडापटूही घडवतो” हे समिधाने प्रत्यक्ष उदाहरण आहे.

स्वप्न मोठं, ध्येय अजून मोठं आता समिधाचे लक्ष्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदकांवर आहे. योग्य प्रशिक्षण, सरकारी मदत आणि प्रोत्साहन मिळाले तर बेळगावची ही शेतकरी कन्या भारताच्या रंगमंचावर सुवर्ण झेंडा रोवेल, अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रात व्यक्त होत आहे.

माऊली भिशी ग्रुप आणि जुने बेळगाव ग्रामस्थांनी तिचा सत्कार करून शाबासकी दिली. याप्रसंगी विश्वनाथ पाटील, पुंडलिक चव्हाण, विलास बिर्जे, सुरेश होसुरकर, मनोहर काजोळकर, आनंद बिर्जे, संतोष शिवनगेकर आदींसह रयत गल्ली आणि जुने बेळगाव येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू बिर्जे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!