
बेलगाम प्राईड / बेळगाव येथील शिवबसव नगर परिसरातील श्री ज्योतिबा मंदिरात रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर ५ हजार दिव्यांनी उजळून टाकण्याचा संकल्प मंदिर समितीने केला आहे.
या दीपोत्सवाला सायंकाळी ६-०० वाजता सुरुवात होणार असून सर्व भक्तांनी यात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. दीपोत्सव झाल्यावर सायंकाळी ७.०० वाजता महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
दीपोत्सव सोहळ्यानंतर रात्री ८.०० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समितीने सर्व भाविकांनी या दीपोत्सवाच्या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.




