Uncategorized

विद्युतभारीत तारेचा शॉक लागून दोन हत्तींचा मृत्यू

बेलगाम प्राईड/ खानापूर तालुक्यातील सुलेगाळी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन जंगली हत्तींचा विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हेस्कॉम खात्याच्या दुर्लक्षामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारेकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, देवराई गावाजवळील सुलेगाळी येथील शेतकरी गणपती सातेरी गुरव व परिसरातील इतर शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे झटका करंट मशीन बसवले होते. अशा प्रकारचे मशीन तालुक्यातील अनेक शेतकरी वापरत असले तरी हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे शेतातून गेलेली वीजवाहिनी तुटून काही दिवसांपासून जमिनीवर पडलेली होती.

https://www.facebook.com/share/v/17xk4yfBki/

मात्र वीज खात्याकडून कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती अशाच पद्धतीची शनिवारी आणखी एक तार तुटून पडल्याने या तारेतून विद्युत पुरवठा सुरू होता. याकडे हेस्कॉम खात्याचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्या तारेतून विद्युत प्रवाह सुरू झाला. दरम्यान, अन्नाच्या शोधात त्या ठिकाणी आलेले दोन जंगली हत्ती त्या तारेच्या संपर्कात आले आणि त्या हत्तींचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही हत्तींच्या मृतदेहांची तपासणी करून आवश्यक कायदेशीर सोपस्कार सुरू केले आहेत.

“ही दुर्घटना हेस्कॉम खात्याच्या दुर्लक्षामुळे घडली आहे. तुटलेल्या तारांची दुरुस्ती वेळेत करण्यात आली असती तर हे दोन निरपराध प्राणी वाचले असते. त्यामुळे संबंधित हेस्कॉम कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून, वन्यजीव संरक्षण आणि विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

यावरून कळते की वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे वन्यजीवांसह नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे. वेळेवर दुरुस्ती न झाल्यास भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात. त्यामुळे हेस्कॉम खात्याने धोकादायक तारांचे निरीक्षण करून तात्काळ दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!