बेळगाव सुवर्णसौध येथे १६ डिसेंबर रोजी अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांचा समारंभ
२ कोटी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालविकास अकादमी – अध्यक्ष संगमेश बबलेश्वर

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकादमीला नवे रूप
बेलगाम प्राईड/ कर्नाटक बालविकास अकादमीच्या वतीने प्रथमच बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांचा मुख्य वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून, २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षांतील पुरस्कार मान्यवरांना मंगळवारी बाल विकास अकादमी पुरस्काराचे प्रदान करण्यात येणार आहेत.
कर्नाटक बालविकास अकादमी राज्यातील सुमारे २ कोटी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध कार्यक्रम राबवत आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली दुपारी १ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष संगमेश बबलेश्वर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यातील ३४ शैक्षणिक जिल्ह्यांमधून निवडलेले पुरस्कारप्राप्त मान्यवर व मुले या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
हे पुरस्कार बालक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना तसेच गुणवंत मुलांना प्रेरणादायी ठरणार आहेत. मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे व मुलांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांचा सन्मान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे ही अकादमीची जबाबदारी आहे. या पुरस्कारांचे वितरण नामवंत व्यक्तींच्या हस्ते व्हावे, या उद्देशाने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत मुलांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कारांची रक्कम
अकादमी गौरव पुरस्कार – ₹२५,०००
मुलांचा चंदिर पुस्तक पुरस्कार – ₹१५,०००
अकादमी बालगौरव पुरस्कार – ₹१०,०००
विशेष गौरव पुरस्कार – ₹१०,०००
२०२२ सालचे मुलांचा चंदिर पुस्तक पुरस्कार
मैसूरचे कोल्लेगाळ शर्मा ( गुब्बीचा ब्रह्मास्त्र ),
विजयपूरचे एस.एस. सातिहाळ ( हाडू कोगिले हाडू ),
बंगळुरूचे डॉ. बेलूर रघुनंदन ( चित्ते ),
विजयपूरचे ह.म. पूजार ( अज्जाच्या घराचा अंगण ),
बागलकोटचे डॉ. करविर प्रभू क्यालकोंड ( मुलाला लस दिली आहे का? )
२०२३ सालचे मुलांचा चंदिर पुस्तक पुरस्कार
दक्षिण कन्नड – निर्मला सुरत्कल ( पुट्टीगे सिट्टिल्ला ),
धारवाड – ललिता पाटील ( गप चूप ),
हावेरी – मालतेश अंगूर ( काडू–मेडू ),
नागराज हुडेध ( बेरगु )
अकादमीचे उपक्रम
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष संगमेश बबलेश्वर यांनी गेल्या दोन वर्षांत अकादमीला अत्यंत सक्रिय स्वरूप दिले आहे. धारवाड येथील अकादमीच्या मुख्य कार्यालयात २० लाख रुपयांच्या खर्चाने आधुनिक स्टुडिओ उभारण्यात आला असून, तो उद्घाटनासाठी सज्ज आहे.
मिशन विद्याकाशी अंतर्गत एसएसएलसी निकाल सुधारण्यासाठी या स्टुडिओचा वापर केला जाणार आहे. राज्यातील तज्ज्ञ व्यक्तींमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निकाल उंचावण्याचा उद्देश आहे.
तसेच संधीवंचित मुलांची ओळख करून त्यांच्यासाठी १५ दिवसांचे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित करण्यात येत आहे. पालकांसाठीही राज्यातील ३१ जिल्ह्यांत विशेष कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूणच गेल्या दोन वर्षांपासून अकादमीला गतिमानपणे पुढे नेणारे संगमेश बबलेश्वर हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाने पुढील काळातही अनेक अर्थपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.




