Uncategorized
Trending
बी. शंकरानंद यांच्या पुतळ्याचे बुुधवारी सायंकाळी अनावरण
उद्या सकाळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या टाईमात बदल सायंकाळी 4-00वाजता

बेलगाम प्राईड/ता.16 : बी. शंकरानंद शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने वतीने माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. 17) सायंकाळी 4-00 वाजता येथील बी. शंकरानंद चौक, बी. शंकरानंद मार्ग बेळगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित राहून त्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण खात्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार असिफ (राजू ) सेठ राहणार आहेत. असे बी. शंकरानंद शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप कणगली यांनी कळविले आहे.



