
मालवण येथे समुद्रात झालेल्या स्पर्धेत पीएसए जलतरणपटूंची कामगिरी
बेलगाम प्राईड/ पॅशनेट स्पोर्ट्स अकादमी (PSA) च्या जलतरणपटूंनी मालवण खुल्या समुद्रातील पोहण्याच्या स्पर्धेत अत्यंत कठीण समुद्रस्थितीत धैर्य, सहनशक्ती आणि उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत कामगिरी केली.
सृष्टी कांग्राळकर हिने ५ कि.मी. अंतराच्या स्पर्धेत ७ वा क्रमांक मिळवून वरिष्ठ व अनुभवी स्पर्धकांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले.वेदांत जाधव याने ३ कि.मी. समुद्र पोहणे यशस्वीरीत्या पूर्ण केले, तर अवघ्या ७ वर्षांचे नमन पाटील आणि यश पाटुकले यांनी ५०० मीटर स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या धाडसाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
साद अकबर खाझी, सामी अकबर काझी, खुशांत भजनत्री आणि ओम पाटुकले यांनी १ कि.मी.अंतर स्पर्धेत यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामगिरीचे स्पर्धा अधिकारी व प्रेक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
सर्व जलतरणपटूंचा नियमित सराव केएलई लिंगराज कॉलेज जलतरण तलावात होत असून, ही कामगिरी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध प्रशिक्षणाचे फलित आहे.
ही सर्व यशस्वी कामगिरी प्रशिक्षक श्यामसुंदर माळी, पूजा माळी, प्रशांत पाटील व सूरज मंगनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शक्य झाली. स्पर्धेत सहभागासाठी मुलांना प्रोत्साहन व विश्वास दिल्याबद्दल पालकांचे विशेष आभार मानण्यात आले.
तसेच, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने पाठिंबा देणारे केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे सर यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याबद्दल अकादमीने कृतज्ञता व्यक्त केली. PSA कडून सर्व जलतरणपटूंना बेळगाव शहराचे राज्यस्तरीय पातळीवर नाव उज्वल केल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा!




