Uncategorized
Trending

१५ व्या राज्यस्तरीय खुल्या समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच दमदार कामगिरी

बेलगाम प्राईड/ सिंधुदुर्ग जिल्हा ॲक्वेटिक असोसिएशनतर्फे मालवण येथील चिवला बीचवर १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या १५ व्या राज्यस्तरीय खुल्या समुद्र पोहण्याच्या स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत स्कंद आर. घाटगेने १ किमी (पॅरा – विना फिन्स) प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच श्रीदत्त डी. पुजारी, सायली एस. घुघरेतकर, वंश जी. बिरजे यांच्यासह इतर खेळाडूंनी विविध वयोगटांत यश नोंदवले. क्लबच्या अनेक जलतरणपटूंनी ५०० मीटर ते ३ किमी अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करून स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध केली.

या सर्व खेळाडूंना सुवर्ण जेएनएमसी व केएलई इंटरनॅशनल जलतरण तलावात प्रशिक्षक उमेश काळघाटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळाले आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल केएलई संस्थेचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी व जलतरण क्षेत्रातील मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!