Uncategorized
Trending
आम. अभय पाटील यांच्या “ड्रीम प्रोजेक्ट”चा भव्य शुभारंभ
आम. अभय पाटील यांच्या “ड्रीम प्रोजेक्ट”चा भव्य शुभारंभ

बेलगाम प्राईड/ बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मनोरंजन व आरोग्यपर क्लबचे लसीकरण केंद्र (Vaccine Depot) येथे आज शुक्रवारी सकाळी भव्य उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला वरिष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थितीत झाली होती या सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
देशात प्रथमच या धाटणीचा आरोग्य, मनोरंजन आणि सामाजिक उपक्रमांचे संमिश्र स्वरूप असलेला क्लब उभारण्यात आला असून ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी व्यायाम, मनोरंजन, संवाद, खेळ आणि वैचारिक उपक्रम यांचा लाभ मिळणार आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात वरिष्ठ नागरिकांनी अभय पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानत या अभिनव उपक्रमामुळे ज्येष्ठांना नवचैतन्य, आनंद आणि सकारात्मक वातावरण लाभणार असल्याचे मत व्यक्त केले.




