अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी समितीचा सकाळी 11 वाजता वॅक्सिंग डेपो येथे मेळावा

बेलगाम प्राईड/ महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भाग बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे येथील मराठी माणसाने वेगवेगळ्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीपासूनच सत्याग्रह उपोषण सभा मेळावे इत्यादी मार्गानी केंद्र सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने केंद्र सरकारने म्हणावे तसे लक्ष न दिल्याने मराठी माणसाला अजून न्याय मिळाला नाही पंतप्रधान गृहमंत्री यांनी लोकसभेत राज्यसभेत आश्वासने देऊनही प्रश्न सुटू शकला नाही.
दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न झाले पण कर्नाटक सरकारने याकडेही टाळाटाळ सुरू केली यातूनच 29 मार्च 2004 रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात येऊन सीमा भागातील 865 मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करावीत अशी मागणी करण्यात आली कर्नाटक सरकारने मात्र दावा कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केले कोणत्याही प्रकारे सीमा प्रदेश महाराष्ट्रात सामील होऊ नये यासाठी कानडीकरणाचा वरवंटा फिरवून हा प्रदेश कर्नाटकातच ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
याचाच एक भाग म्हणून बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन घेणे सुरू केले आहे 2006 पासून कर्नाटक सरकार येथे अधिवेशन भरवीत आहे. या अधिवेशनाला विरोध करून सीमा भागातील मराठी जनतेची मागणी केंद्र सरकार समोर आणि कर्नाटक सरकार समोर ठेवण्यासाठी मराठी माणसांच्या वतीने येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. कर्नाटक सरकारने अनेक वेळा परवानगी दिली आहे.
पण अलीकडे काही कन्नड संघटनांच्या विरोधी भूमिकेमुळे प्रशासनाने मेळाव्यात अडकाठी आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत यावर्षी 8 डिसेंबर पासून अधिवेशन सुरुवात होणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी माणसांचा महामेळावा व्हॅक्सिन डेपो टिळकवाडी बेळगाव येथे सकाळी ठीक ११- ०० अकरा वाजता आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास मराठी भाषिक जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहून आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करावा अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भाग बेळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे मेळावा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात वेळेवर सुरुवात होईल याची खबरदारी घेऊन कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे विनंती करण्यात येत आहे




