Uncategorized
Trending

बेळगावच्या ज्योत्स्ना जांगळे धारवाड हायकोर्ट बारच्या खजिनदार पदी निवड 

बेलगाम प्राईड / बेळगाव शहापूर येथील जांगळे कुटुंबाच्या सुनबाई ॲड. ज्योत्स्ना धनवे-जांगळे या धारवाड येथील हायकोर्ट ऑफ कर्नाटक, धारवाड बेंच बार असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

बार असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला वकील या पदावर निवडून आल्या असून बेळगावसाठी हा विशेष अभिमानाचा क्षण बनला आहे.

धारवाड बेंच बार असोसिएशनमध्ये यंदा प्रथमच ‘खजिनदार’ हे पद निर्माण करण्यात आले होते. या पहिल्याच निवडणुकीत ॲड. ज्योत्स्ना जांगळे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत भरघोस मतांनी विजय मिळवला. त्यांच्या या निवडीमुळे बेळगावच्या कायदेशीर क्षेत्राचा नावलौकिक वाढला असून, महिलांसाठीही एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

ॲड. ज्योत्स्ना त्या गणेशपुर गल्ली शहापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता जांगळे यांच्या स्नुषा आहेत.त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल बेळगाव, शहापूर तसेच धारवाड येथील वकील संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!