Uncategorized
Trending

चोरी प्रकरणी एपीएमसी पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल डीसींकडे तक्रार 

बेलगाम प्राईड / संगमेश्वरनगर, बेळगाव येथे सहा महिन्यापूर्वी झालेल्या आपल्या घरातील सुमारे 75 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी एपीएमसी पोलिसांकडून अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याबद्दल संगमेश्वरनगर येथील मीना लालचंद चौहान व त्यांचा मुलगा संजयकुमार चौहान यांनी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

संगमेश्वरनगर बेळगाव येथील मीना लालचंद चौहान व त्यांचा मुलगा संजयकुमार चौहान यांनी आपल्या वकिलांच्या उपस्थितीत आज गुरुवारी आपल्याला न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. माझ्या आईच्या सुमारे 75 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांच्या चोरीबाबत 5 जून 2025 रोजी बेळगाव शहरातील एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये नोंदवलेल्या तक्रार क्रमांक 60/2025 च्या तपासात निष्काळजीपणा आणि विलंब केला जात आहे. एफआयआर दाखल होऊन आता 6 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे.

https://www.facebook.com/share/v/17XFoWT5FL/

तथापि आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही तपासात कोणतीही कारवाई झालेली नाही. मी आणि माझी आई स्वतः पोलिस ठाण्याला अनेकदा भेट देऊनही प्रत्येक वेळा प्रकरणाला चालना देण्याचे प्रयत्न केले आहे. आणि लवकरच ते सोडवले जाईल असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे. मात्र या आश्वासनांनंतर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी जेंव्हा जेंव्हा बोलावले तेंव्हा आम्ही पूर्ण सहकार्य केले आहे. एवढे करूनही नवीन माहिती किंवा प्रगतीऐवजी आम्हाला खोटी आश्वासने, धमकी आणि विशेषतः माझ्या वृद्ध आईशी निष्कर्षता वर्तन करण्यात आले आहे.

एखाद्या गुन्ह्याचा बळी ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकाशी असे वर्तन कितपत योग्य आहे. याव्यतिरिक्त आमचे वकील उदय यांनी डीसीपी, पोलिस आयुक्त, डीसीपी गुन्हे विभागाचे एसीपी यांना नोंदणीकृत कायदेशीर नोटीस बजावून देखील कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. याचा तपास लावण्याऐवजी दुर्लक्षित करण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंतीचा अर्ज देण्यात आला आहे.

जेणेकरून माझी आई मीना लालचंद चौहान हिला न्याय मिळेल, अशा आशयाचा तपशील संजयकुमार चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!