Uncategorized
Trending

जलतरणपटू श्रीधर मालगी याला कर्नाटक सरकारचा प्रतिष्ठित ‘एकलव्य’ पुरस्कार

बेलगाम प्राईड/ बेलगावचा अभिमान व पॅरा स्विमिंग क्षेत्रातील चमकता तारा श्रीधर मालगी याला कर्नाटक सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यातील सर्वोच्च क्रीडा सन्मानांपैकी एक असलेल्या ‘एकलव्य पुरस्काराने’ गौरविण्यात आले आहे. बंगळुर येथे आयोजित भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्विमर्स क्लब बेलगाव व अ‍ॅक्वेरियस स्विम क्लबचे खेळाडू असलेल्या श्रिधर मालगी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. आजपर्यंत 12 आंतरराष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत त्यांनी तब्बल 19 पदके पटकावली आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावर 10 पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये 57 सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची उल्लेखनीय कमाई त्यांच्या नावे आहे.

श्रीधर याच्या जलतरण प्रवासाची सुरुवात 2012 मध्ये झाली. जलतरणचे गुरु उमेश कलघटगी यांनी त्यांच्या क्रीडा क्षमतेची दखल घेऊन त्याला जलतरणासाठी प्रोत्साहन दिले. तर कुटुंबियांचे संपूर्ण पाठबळ त्याला लाभले. सध्या ते झी स्विम अकॅडमी, बंगळुर व सुवर्ण जेएनएमसी ऑलिंपिक जलतरण तलाव, बेलगाव येथे कठोर सराव करतो. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक उमेश कालघटगी व ऑलिंपियन शरथ एम. गायखोड यांचे मोलाचे मार्गदर्शन असून गोस्पोर्ट्स फाउंडेशनही सातत्याने सहकार्य करत आहे.

अफाट मेहनत, शिस्त व चिकाटीच्या बळावर श्रीधर मालगी यांनी प्राप्त केलेला हा सन्मान क्रीडा क्षेत्रातील सर्वांना प्रेरणा दायी देणारा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!