
बेलगाम प्राईड/ सलग १४ व्या वर्षी कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या एकांकिका स्पर्धे दरम्यान करंडकाचे अनावरण उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद काळे, वामन पंडीत, व सुनील खानोलक यांच्या बरोबर संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे, व्हा. चेअरमन शाम सुतार उपस्थित होते.

प्रारंभी चेअरमन हंडे यांनी १३ वर्षाच्या कालखंडाचे थोडक्यात विवेचन करून आजवर मान्यवर परीक्षक चोखंदर नाट्य रसिक व नाट्यकर्मींच्या सहकार्यामुळेच स्पर्धेमध्ये सातत्य राखण्यात आले असे नमूद केले.यावेळी बोलताना वामन पंडीत यांनी नाट्य रसिकांकडून मिळणाऱ्या भरघोस पाठिंबा व संस्थेने कष्टाने उभ्या केलेल्या या स्पर्धांचे स्वागत व प्रशंसा केली . यावेळी संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर,संजय चौगुले,शरद पाटील, लक्ष्मीकांत जाधव, सदानंद पाटील ,सुभाष सुंणठणकर निळूभाऊ नार्वेकर.. व कर्मचारी वर्ग पिग्मी कलेक्टर उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धे मध्ये १८ स्पर्धक संघानी सहभाग दर्शविला असून आज या पैकी ९ संघानी सादरीकरण केले आहे. शेवटच्या एकांकिका नंतर मान्यवरांचा हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.




