
बेलगाम प्राईड/ राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘वोट चोर गड्डी छोड’ या महा रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगाव ग्रामीण युवा काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. युवा नेता मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवास होत असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
बेळगाव येथून कार्यकर्ते गोवा विमानतळाकडे रवाना होणार असून, तेथून विशेष विमानाद्वारे दिल्लीला पोहोचणार असल्याची माहिती वेंकट पाटील यांनी दिली. लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी ही महा रॅली आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी पदमराज पाटील, संगणगौडा पाटील, बसवंत कडोलकर, निलेश सावगांवकर, निगप्पा तल्लूरी, प्रणव गोडसे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. एकूण 50 युवा कार्यकर्ते या महा रॅलीसाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवून देशातील लोकशाही बळकट करण्याचा संकल्प युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.




