
बेलगाम प्राईड/ महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गणेशपुर येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात स्थानिक नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेतल्या. हा जनता दरबार दलित नेते मल्लेश चौगुले यांच्या निवासस्थानी घेण्यात आला.
या वेळी गणेशपुर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, घरकुल, महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध समस्या नागरिकांनी मंत्र्यांसमोर मांडल्या. प्रत्येक तक्रारीची नोंद घेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
याप्रसंगी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, सामान्य जनतेच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी जनता दरबार उपयुक्त ठरतो. येत्या काळात गणेशपुर परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जनता दरबारामुळे नागरिकांना आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी काडा अध्यक्ष युवराज कदम,आडवेश इठगीमठ, महेश कोलकर, यांच्यासह काँग्रेस नेते स्थानिक रहिवासी उपस्थित होते.




