
बेलगाम प्राईड/ राज्यभर राबविण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव येथे गृह कार्यालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे राज्याच्या बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते बाळांना लस घालून उद्घाटन करण्यात आले.
आपल्या घरात ५ वर्षांखालील मुले असल्यास त्यांना लस देण्यासाठी विसरू नका—त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन बाळांना लस देऊन पोलिओमुक्त समाज निर्माणासाठी हातभार लावा.
यावेळी तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. रमेश दंडगी, पल्स पोलिओ नोडल अधिकारी डॉ. संजय डुम्मगोळ, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुनधोळी, डॉ. पवन गलगली, अंगणवाडी पर्यवेक्षक, आशा कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.




