
बेलगाम प्राईड / राज्याचे अर्बन डेव्हलपमेंट मंत्री सुरेश भैरवती हे बुधवारी सायंकाळी बेळगावला आले होते. यावेळी उत्तरचे आमदार असिफ राजू शेठ यांच्यासह बेळगाव पालिकेचे आयुक्त महापौर सत्ताधारी आणि विरोधी गटाचे नगरसेवक यांनी मंत्री सुरेश भैरवती यांची भेट घेतली आणि त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी महापौर व गटाच्या नगरसेवकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यानंतर मंत्री मोहदयांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले होते यापूर्वी कर्नाटक राज्याकडून महानगरपालिकेला वेगळा विविध कामे करण्यासाठी निधी दिला जात होता. मात्र हल्ली निधी मिळत नसल्याने महानगर व्यक्तीतील नागरी समस्या जनतेला करून देण्यासाठी निधी अपुरा पडत आहे यासाठी सरकारच्या वतीने इतर महानगरपालिकेला जसा निधी दिला जातो त्याचप्रमाणे बेळगाव महानगरपालिकेलाही निधी दिला जावा असे यात नमूद करण्यात आली होते.
मंत्री सुरेश भैरवती यांनी यावर आपण दखल घेऊन निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.




