
बेलगाम प्राईड/ नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. या निषेधार्थ सुवर्ण विधानसौधच्या आवारातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने दाखल केलेले आरोपपत्र न्यायालयाने फेटाळल्याने केंद्र सरकारची कारवाई राजकीय सूडातून प्रेरित असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. भाजप सरकार विरोधकांना दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले. यावेळी राज्यातील मंत्री, आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




