
बेलगाम प्राईड/ यक्षित युवा फाउंडेशन मार्फत राव युवा अकॅडमीच्या 37व्या तायक्वांडो कलर बेल्ट पदोन्नती चाचणी दिनांक 21 डिसेंबर 2025 ला संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडला.
या चाचणीत तायक्वांडो क्रीडापटू शौर्य श्रीपाद शानबाग, मनश्विनी धर्मेंद्रकुमार प्रजापती, तक्ष विजयमहांतेश गबसवलगी, हर्षिव अविनाश पटेल, नव्या, आकृती आकाश चव्हाण, मानवी योगेश पटोले, निवेदिता सागर पाटील, स्मिथ नवखंडकर आणि श्रीराज लोकेश भातकांडे यांनी येलो बेल्ट, प्रज्वल बसवराज गुडास, लव्यम पांडे, श्राव्या श्रीपाद शानबाग, कनिका विश्वनाथ चोन्नाड, सानवी सुमीत अन्वेकर, निर्वी विजयमहंतेश गबसवलगी, शिवांश रोहित गुंडकल, अद्वित नागनाथ गोंड, शौर्य सौरभ पोटे आणि सानवी अमित पोतदार यांनी ग्रीन बेल्ट, अनन्या डोळेकर यांनी ग्रीन वन बेल्ट , स्पृर्ती तालुकर, निशिका बनेश्वर पात्रा, कनिशा अभिनव जैन, ओविया दर्शन चौधरी, सोयरा प्रसाद घाडी आणि श्राव्या लोकेश भातकांडे यांनी ब्लू बेल्ट, सानवी संदीप वासोजी, दीप शंकर पाटील, इशान सागर पाटील आणि हर्ष जनक कुमार वैष्णव यांनी ब्लू वन बेल्ट, श्रेयसगौडा वीरंगौडा गौरी आणि सान्वी सागर पाटील यांनी रेड बेल्ट तर स्तुती अभय टुमरी आणि मोहम्मदशफी लतीफशाह चंदशाह यांनी रेड वन बेल्ट मिळवण्या साठी भरपूर परिश्रम केले.
तसेच वेदांत विनायक खडबडी, घगन प्रेम शिवपूजीमठ, सिद्धार्थघौडा वीरंगौडा गौरी, आरुष अभय टुमरी, मोहम्मदशोहेब लतीफशाह चंदशाह, विहान वैभव कामटे आणि शिवराज महादेव मेणसे या क्रीडापटूने आपले प्रस्तुत बेल्ट रँक जपण्यासाठी विशेष शारीरिक तंदुरुस्ती चाचणीत सहभाग घेतला.
भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक व यक्षित युवा फाउंडेशन चे माननीय अध्यक्ष तायक्वांडो मास्टर श्रीपाद आर राव यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि देखरेखित हा पदोन्नती चाचणी यशस्वी रीतीने पार पडला.
या संदर्भात तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच असलेले यक्षित युवा फाउंडेशनचे ट्रस्टी स्वप्नील राजाराम पाटील आणि सरचिटणीस वैभव राजेश पाटील उपस्थित होते.




