
बेलगाम प्राईड/ रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे साई हॉस्पिटलच्या सहकार्याने येत्या मंगळवार दि.23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगाई गल्ली, वडगाव बेळगाव येथील श्री मंगाई देवी मंदिरामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. एस. एम. दोडमनी यांच्या श्री साई हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामध्ये रक्तातील साखर, रक्तदाब, ईसीजी, हृदय रोग या संदर्भात मोफत तपासणी केली जाणार आहे.

तसेच शिबिरामध्ये डॉ. पटवर्धन यांच्या रुग्णालयातर्फे डोळ्यांची आणि डॉ. रेखा यांच्या वतीने त्वचा, केस गळती आणि लठ्ठपणा समस्या याची मोफत तपासणी केली जाईल. तरी नागरिकांनी या शिबिराचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष रो. विकास गाडवी, रो. अजितकुमार हलसडे व संयोजक सचिव रो. डॉ. रेखा अक्की यांनी केले आहे.




