26 लाखाची दारू घेऊन विनापरवाना वाहतूक पोलिसांनी केली जप्त

बेलगाम प्राईड / विनापरवाना सरकारी कर चुकून गोव्याहून महाराष्ट्र मध्ये जात असलेल्या दारूची वाहतूक करणारा ट्रक अडवून यातील 26 लाखाची दारू जप्त करण्यात आल्याची कारवाई माळ मारुती पोलिसांनी शनिवारी सकाळी श्रीनगर महामार्ग येथे केली .
ट्रक क्रमांक के ए 27 सी 5419 या वाहनातून गोव्याहून महाराष्ट्रत जात असल्याची माहिती निनावी फोन द्वारे पोलिसाना देण्यात आली. यावरून मळ मारुती पोलिसांनी सापळा रचून ही ट्रक श्रीनगर महामार्गावर थांबविण्यात आली. पोलिसांनी या ट्रकची तपासणी केली असता यामध्ये बाहेरील बाजूस वेस्ट असलेले प्लास्टिक आढळून आले. हे काढले असता आत मध्ये दारूचे बॉक्स आढळून आले.

यामध्ये 7,000 लिटर लिटर दारू दारू असलेले नऊशे बॉक्स पोलिसांनी जप्त केले याची अंदाजे किंमत 25 ते 26 लाख इतकी होत असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयुक्तांनी सांगितले की सध्या महाराष्ट्र मध्ये जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे यासाठी दारूची वाहतूक केली असावी याबरोबर पोलीस आयुक्तांनी माळ मारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी आर गड्डेकर व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक होण्याप्पा तलवार, हुळगिरी, उदय पाटील व त्यांचे सहकारी पोलीस यांचे कौतुक केले तसेच या सर्व पोलिसांना विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दारू वाहतुकीचा गुन्हा माळ मारुती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला असून याची पुढील चौकशी केली जात आहे.




