
बेलगाम प्राईड /ता. 8 : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन बेळगावात भरवण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी अधिवेशन भरणार आहे.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला स्थापनेच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षातील 58 नावे हे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन भरणार आहे अशी माहिती साने गुरुजी कथामाला चे राष्ट्रीय अध्यक्ष हसन देसाई यांनी दिली. गुरुवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. येथील इंद्रप्रस्थ नगर, टिळकवाडी मधील श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन मध्ये अधिवेशन भरणार आहे.
शनिवारी सायंकाळी सात ते आठ पर्यंत कार्यकारणी सभा होणार आहे त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर रात्री साडेनऊ ते दहा या वेळेत विश्वस्त सभा होणार आहे.
रविवारी सकाळी सव्वा सात ते सव्वा नऊ या वेळेत ठळकवाडी हायस्कुल पासून अधिवेशन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी निघणार आहे. सकाळी दहा वा . प्रार्थना व उद्घाटन सोहळा, दुपारी साडेबारा पासून परिसंवाद – साने गुरुजी विचारधारा’ या विषयावर होणार आहे.
दुपारी अडीच ते साडेतीन सत्कार समारंभ, साडेतीन ते साडेचार खुले अधिवेशन आणि सायंकाळी साडेचार वाजता अधिवेशन समारोप होणार आहे. उद्घाटक म्हणून द. म. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सरोज एन. देसाई, जागतिक भाषा तज्ञ व अखिल भारतीय राष्ट्र सेवादल पुणे माजी अध्यक्ष डॉ गणेश देवी आणि जीएसटी बेळगावचे उपायुक्त आकाश चौगुले आदी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी स्वागताध्यक्ष राजाभाऊ पाटील, स्थानिक स्वागत समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सचिव कृष्णा शहापूरकर, शिक्षिका रिटा रोड्रिक्स आधी उपस्थित होते.




