Uncategorized
Trending

राजहंसगड येथे रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन व हळदी कुंकू समारंभ….

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार भूमिपूजन….

बेलगाम प्राईड/ मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या राजहंसगड येथील भंगी रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन बुधवार दिनांक २१ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता आयोजीत करण्यात आले आहे.तसेच महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रमही आयोजित केलेला आहे..

गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. याबाबत माजी तालुका पंचायत सदस्य सिध्दाप्पा छत्रे यांनी हि बाब मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. याकडे तातडीने मंत्री महोदयांनी लक्ष देऊन, १ कोटी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला व गावातील संपुर्ण रस्ते काँक्रीटीकरणं करण्याचे आदेश दिले. यामुळे येथील गावकऱ्यातून आभार व्यक्त होत आहेत…

या रस्ते कामासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २१ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता हा कार्यक्रम आयोजित केला असून सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन होणारं आहे. त्यांनतर रस्ते कामाचं भूमीपूजन व हळदी कुंकू समारंभ होणारं आहे.

यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, काडा अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य, देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थ आणि महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!