
बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील लव्हडेल सेंट्रल स्कूल येथे अराईज स्विमिंग अकॅडमीतर्फे आयोजित राज्यस्तरीय बेळगाव स्विम फिट -2026 या पदकविहीन जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी तब्बल 95 सुवर्ण, 49 रौप्य व 29 कांस्य पदकांसह 9 वैयक्तिक अजिंक्यपद आणि जनरल चॅम्पियनशिप अर्थात सर्वसाधारण अजिंक्यपदाचा करंडक जिंकून स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.
सदर राज्यस्तरीय पदकविहीन जलतरण स्पर्धा गेल्या दि. 10 व दि. 11 जानेवारी 2026 रोजी यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी मिळविलेले यश (अनुक्रमे नांव, सुवर्ण, रौप्य, कांस्य यानुसार) पुढील प्रमाणे आहे. 1) स्वरा कलखांबकर 9 – -, 2) भगतसिंग गावडे 8 1 -, 3) कृशा पी. कुलकर्णी 8 – -, 4) राघव ए. कडट्टी 7 3 -, 5) सायली एस. घुग्रेटकर 7 2 -, 6) श्रीदत्त डी. पुजारी 7 2 -, 7) नमन पाटील 7 1 -, 8) दर्शिका निट्टुरकर 6 – -, 9) रिचा व्ही. पवार 5 2 -, 10) आयुष मुतकेकर 3 4 -, 11) वेध ए. मानकापुरे 3 1 3, 12) अभ्यंत व्ही. पवार 3 1 -, 13) आरवी वाय. मुतकेकर 3 1 -, 14) वैभवी व्ही. मोरजकर 2 5 -, 15) स्वराली एस. शिवणगेकर 2 3 1, 16) मोहम्मद जमादार 2 2 3, 17) गौरी पी. चतुर 2 2 -, 18) धनवी व्ही. मोरजकर 2 1 3, 19) साकेत होसमथ 2 1 1, 20) विहान एस कुलकर्णी 2 1 -, 21) विहान कोरी 2 1 -, 22) निधिश एम. पाटील 2 – 1, 23) रित्वी नरसगौडा 1 1 1, 24) रुतु आर. काग्गोडी – 3 1, 25) अद्विका पी. – 2 1, 26) यक्षिथ आर. हिरेमठ – 2 1, 27) आद्वेश जी. हिरेमठ – 1 3, 28) येशस आर. हिरेमठ – 1 2, 29) सिद्धार्थ मोराबाद – 1 1, 30) कैरवी पी तेंडोलकर – 1 1, 31) नील फ्रान्सिस – 1 -, 32) ओजस कालखांबकर – 1 -, 33) रितू के. लाड – 1 -, 34) किया ए. पाटील – – 3,श35) रुद्र डी. पुजारी – – 2, 36) आर्यन कारीगर – – 1. या जलतरणपटूं पैकी स्पर्धेत श्रीदत्त डी.पुजारी, भगतसिंग गावडे, दर्शिका निट्टूरकर, स्वरा कालखांबकर, नमन पाटील, कृशा पी. कुलकर्णी, राघव कडट्टी, सायली एस. घुग्रेटकर आणि ऋचा पवार यांनी वैयक्तिक अजिंक्यपदे पटकावली.
वरील सर्व यशस्वी जलतरणपटू सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल (ऑलिंपिक आकार) आणि केएलई इंटरनॅशनल स्विमिंग पूल, बेळगाव येथे उमेश कलघटगी आणि जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर, महेश पवार व विनायक आंबेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर प्रशिक्षण घेत आहेत. या सर्वांना केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रो.अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाने, आणि अनेक हितचिंतकांचे सततचे प्रोत्साहन आणि पाठिंबा लाभत आहे.




