Uncategorized
Trending

आनंदवाडी महिलांच्यावतीने हळदी- कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा 

बेलगाम प्राईड/ आनंदवाडी येथील महिलांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास गल्लीतील ज्येष्ठ महिला श्रीमती. यमुक्का सरनोबत व पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. कल्पना भांदुर्गे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमा दरम्यान चंदुकाका ज्वेलर्स यांच्यावतीने महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उखाणे, बादलीत- बॉल टाकणे तसेच इतर खेळांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सौ. माधवी सुतार, सौ. सुजाता पाटील, सौ. पूजा मुचंडी यांच्याहस्ते पुष्प देऊन करण्यात आले व चंदुकाका ज्वेलर्स यांचे स्वागत व आभार सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधुरी जाधव यांनी मानले. तसेच हा कार्यक्रम महिलांमधील एकोपा, परंपरा आणि आनंदाचे प्रतीक ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!