Uncategorized
Trending

आंदोलनाची घेतली दखल : एलएनटीने नेहरू रोडवरील रस्त्यांच्या दुरुस्तीला केली सुरुवात..

बेलगाम प्राईड/ टिळकवाडी परिसरात एलएनटी कंपनीकडून निकृष्ट दर्जेच्या कामाविरोधात आमदार अभय पाटील आणि स्थानिक नागरिकांनी कार्यालयासमोर ठाण मांडून आंदोलन केले होते. या आंदोलनात नगरसेवक आनंद चव्हाण, जयंत जाधव, नितीन जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते सारंग राघोचे यांनी सहभाग घेतला होता. या ठोस आंदोलनानंतर अखेर L&T व्यवस्थापनाने दखल घेत नेहरू रोड, टिळकवाडी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्ती व रिपेअरिंगचे काम हाती घेतले आहे.

नेहरू रोडवरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला होता. त्यातूनच लोकप्रतिनिधी व नागरिक एकत्र येत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम आता प्रत्यक्षात दिसून येत असून रस्त्यांच्या कामास सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, रस्त्यांची दुरुस्ती दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!