
बेलगाम प्राईड/ महिला व बालकल्याण विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘अक्कापडे’ योजनेसाठी बेळगाव जिल्ह्यातून नियुक्त करण्यात आलेले गृहरक्षक दलाचे कर्मचारी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बेळगाव येथील गृह कार्यालयात उपस्थित राहून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी अक्कापडे योजना कोणत्या प्रकारे कार्यरत असावी याबाबत मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. बेळगाव हा मोठा जिल्हा असून अक्कापडेने अत्यंत प्रभावीपणे कार्य केले पाहिजे. महिलांना, विशेषतः विद्यार्थिनींना विश्वासात घेणे आवश्यक आहे. “हे आपलेच आहेत” अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यांनी आपल्या समस्या निर्धास्तपणे तुमच्यापर्यंत मांडाव्यात असे वातावरण निर्माण करावे असे मंत्र्यांनी सांगितले. या प्रसंगी गृहरक्षक दलाचे अधिकारी तसेच अक्कापडेवर नियुक्त गृहरक्षक महिला उपस्थित होत्या.




