
बेलगाम प्राईड / बेळगाव शहरातील हिरेबागेवाडी सामुदायिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व चिमुकल्या मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर डॉ. राहुल बंटी यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून १३४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई खात्रीशीर माहितीच्या आधारे करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, शिवबसवन नगर येथील डॉ. बंटी यांच्या निवासस्थानी तपासणीदरम्यान घरातील बेडरूममध्ये गांजा आढळून आला. तसेच वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी स्वतः गांजा सेवन केल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात डॉ. राहुल बंटी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. मात्र, इतका गंभीर प्रकार समोर येऊनही आरोग्य विभागाकडून अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
हिरेबागेवाडी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. राहुल बंटी यांच्या घरात अमली पदार्थ आढळून आले आहेत. तसेच स्वतः डॉक्टरांनी गांजा सेवन केल्याचे वैद्यकीय तपासणीतूनही स्पष्ट झाले आहे.
बेळगाव शहरातील शिवबसव नगर येथे डॉक्टरचे घर आहे.डॉ. बंटी हे हिरेबागेवाडी सामुदायिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी आहेत.ते हिरेबागेवाडी परिसरातील चिमुकल्या मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.डॉक्टरविरोधात माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




