
बेलगाम प्राईड/ बेळगाव बार असोसिएशन अर्थात वकील संघटनेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून ॲड. शीतल एम. रामशेट्टी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली असून त्याबद्दल त्यांचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनातर्फे अभिनंदन करून स्वागत करण्यात आले.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांनी आपल्या पदाचा गेल्या 3 जानेवारी रोजी अचानक राजीनामा दिला आहे. परिणामी बार असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली. सदर बैठकीत संघटनेच्या नूतन अध्यक्षांची निवड होईपर्यंत प्रभारी अध्यक्ष म्हणून ॲड. शितल एम रामशेट्टी यांचे नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
त्यानुसार नियुक्ती होताच काल सोमवारी बेळगाव न्यायालय आवारातील वकिल समुदाय भवन येथे ॲड. रामशेट्टी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून तसेच कार्यकारी मंडळामध्ये स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव बार असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. वाय. के. दिवटे, ॲड. एस. एस. किवडसन्नावर, ॲड. बसवराज मुगळी, ॲड. सुरज नागनुरी, ॲड. अनिल पाटील, ॲड. सुमित अगसगी, ॲड. इराण्णा पुजेरी आदींसह बहुसंख्य वकील उपस्थित होते.




